आयएमआरच्या चार विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीत निवड

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीत निवड झाली. या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात गौरव करण्यात आला.

आयएमआर महाविद्यालयातील बीसीए तृतीय वर्षातील अनिकेत वैद्य आणि प्रतिक पाटील यांची परिसर मुलाखतीतून मेकरॉकर टेक्नोलॉजीत वेब अँड ॲप डेव्हेलपमेंटसाठी, तर एमसीएच्या ओम चौधरी आणि दीपांशू चौधरी यांची जेजेआयटी इन्फोटेक मध्ये ज्युनिअर इंटर्न डेव्हेलपरच्या पदावर निवड झाली. यानिमित्त खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तर आयएमआरचे संचालक डॉ. बी.व्ही. पवार ह्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या वेळी प्रा.पुनीत शर्मा, प्रा.उदय चतुर, प्रा.डॉ.तनुजा फेगडे, प्रा.श्वेता फेगडे उपस्थित होते. या परिसर मुलाखतीसाठी आयएमआरतर्फे प्रा. पुनीत शर्मा, तर मेकरॉकर टेक्नोलॉजीच्या वतीने संचालक तुषार परदेशी यांनी संयोजन केले.

Protected Content