विद्यापीठाच्या ४ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीसाठी निवड !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीमध्ये रसायनशास्त्र प्रशाळेतील एम.एस्सी. (पॉलीमर केमिस्ट्री, ऑरगनिक केमिस्ट्री आणि पेस्टीसाईड अॅण्ड अॅग्रोकेमीकल्स) ह्या विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी हैद्राबाद येथील नोव्हा अग्रीटेक लि. या नामांकीत कंपनीने घेतलेल्या आनलाईन मुलाखतीद्वारे विद्यापीठातील चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

या परिसर मुलाखतीसाठी ऑनलाईन पध्दतीने नोव्हा अग्रीटेक लि. कंपनीचे मनुष्यबळ पुरवठा व्यवस्थापक गोस बाशा शेख हे उपस्थित होते. त्यात शशिकांत महाजन, ऋषिकेश खेडकर, कुशवंत सोनवणे, शैलेश पाटील या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना वार्षिक वेतन २.४० लाख रक्कम देण्यात येणार आहे. केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाचे समन्वयक प्रा. रमेश सरदार, उपसमन्वयक डॉ. उज्वल पाटील, प्लेसमेंट ऑफिसर श्रीमती सोनाली दायमा यांनी ऑनलाईन मुलाखतीचे व्यवस्थापन केले. यावेळी रसायनशास्त्र प्रशाळेचे प्लेसमेंट समन्वयक डॉ. अमरदीप पाटील, व पॉलिमर केमिस्ट्रीचे विभाग प्रमुख प्रा. विकास गिते व प्रा. सौ. बेंद्रे हे उपस्थित होते. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील रसायनशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. धनंजय मोरे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Protected Content