यावल परिसरात माती परीक्षण मार्गदर्शन कार्यशाळा

यावल,  प्रतिनिधी ।  गोदावरी फाउंडेशनव्दारे संचलित महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीदूत आशुतोष येवले  यांनी यावल शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांना माती परीक्षण प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. 

 

कृषीदूत आशुतोष मुकेश येवले याने  ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमांतर्गत यावल शहर व  ग्रामीण शिवारात माती परीक्षण प्रात्यक्षिक दाखवत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. उल्हास पाटील माती-पाणी तपासणी प्रयोगशाळा येथून मृदा चाचणी केली. यावेळी उपस्थित शेतकरी कृष्णात पाटील, राहुल पाटील- सोनवणे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कृषिदूत आशुतोष येवले याने शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे फायदे, मातीत आढळणारे विविध पोषक घटक व त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कसे अबाधित ठेवता येईल यावर  शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.  सध्याचा मृदेचा होणारा ऱ्हास व माती परीक्षण शिबिरांची खेडोपाडी असणारी आवश्यकता यावरही येवले यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर माती परीक्षण कसे आणि का करावे याबाबतची माहिती दिली. त्याला प्राचार्य शैलेश तायडे, प्रा. मोनिका नाफाडे-भावसार, प्रा. मोनिका भावसार यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी परिसरातील इतर शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Protected Content