नशिराबादला अजिंक्य महिला मंडळाची स्थापना : नवरात्र उत्सव करणार साजरा

नशिराबाद, प्रतिनिधी | येथील साथी बाजार परिसरात असलेल्या अजिंक्य (महिला )मंडळात यंदा प्रथमच सुरुवात करण्यात आली आहे. दुर्गा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळात महिलांनी पुढाकार घेतला असून दहा दिवस मंडळाचा सर्व कारभार महिलाच सांभाळणार आहे तर या उत्सवादरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रमाचे कार्यक्रम देखील महिलावर्ग राबविणार आहे.

 

नवरात्र उत्सवाला सात ऑक्टोंबर रोजी सुरुवात होत आहे. या नवरात्र उत्सवात नशिराबाद गावात प्रथमच अजिंक्य (महिला) मंडळ स्थापन करून यंदा दुर्गा उत्सव साजरा करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. यात दहा दिवसात अजिंक्य महिला मंडळाचा कारभार महिला भगिनी सांभाळणार असून या उत्सवादरम्यान विविध समाजोपयोगी कार्यक्रम मंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. तर महिलाच मातेची गरबा, दांडिया खेळत स्थापना व विसर्जन ही करणार आहे.

महिलांनीही उत्सवात सहभागी व्हावे: अध्यक्ष शारदा भावसार

अजिंक्य ( महिला) मंडळच्या अध्यक्षा शारदा भावसार यांनी सांगितले की, यावर्षी अजिंक्य ( महिला) दुर्गा उत्सव मंडळातर्फे सर्व कारभार महिलांच्या हस्ते होणार असून महिलांनी प्रत्येक उत्सवात सहभाग नोंदवून उपक्रम राबवावे हीच संकल्पना आम्ही सर्व सदस्यांनी मांडत पुढाकार घेतला आहे. तर दहा दिवसात विविध उपक्रम मंडळातर्फे राबवले जाणार असून गरबा, दांडिया खेळत मातेची स्थापना व विसर्जन महिलांच्या हस्ते होणार आहे.

 

अशी आहे महिला उत्सव समिती

अजिंक्य (महिला ) दुर्गाउत्सव मंडळाची नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत अध्यक्ष शारदा भावसार, उपाध्यक्ष संगीता चौधरी,खजिनदार सुनीता शिवराम,  सचिव माधुरी कोलते, सदस्य पुष्पा नांदुरकर, रेखा शिवराम, सोनल टापरे, सुनिता माळी, लक्ष्मी यवकार, शोभा बाविस्कर ,कविता राजपूत ,अलका सपकाळे, अनिता महाजन, सीमा भावसार, साधना पाटील आदींची उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे.

 

Protected Content