लॉजिस्टिक इंडिया कंपनीची २८ लाख ६३ हजारांमध्ये फसवणूक !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गाड्या ट्रान्सपोर्ट करीता लावल्याचे दाखवून भाडे आणि गाडयांमध्ये डीझेल भरण्याच्या नावाखाली जळगाव शहरातील एमआयडीसीतील बीएलआर लॉजिस्टिक इंडिया कंपनीची तब्बल २८ लाख ६३ हजार ७७५ रुपयांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ३० मे २०२२ रोजी घडलेल्या या फसवणुकीविरोधात सोमवार, २६ डिसेंबर रोजी एकाजणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लोखिंदर मोहरसिंग (वरा. सद्गुरू नगर, जळगाव) याने प्रिती कार्गो डीस मुव्हर्स ट्रान्सपोर्ट कंपनी, ब्लॉक नं.१, प्लॉट नं.१, सर्वे नं.७५, जगवानी, एमआयडीसी जळगाव, श्री करणी ट्रेलर सर्विस कंपनी, शॉप नं.०४, प्लॉट नं.१५९७ प्रताप हॉटेलजवळ, नाशिक, श्री -०१ करणी ट्रान्स लाईन कंपनी, प्लॉट नं.१६, सद्गुरू नगर, सागर शॉप, आयोध्या नगर, जळगाव, एस.आर. लॉजीस्टीक्स कंपनी, प्लॉट नं. सी-७, गिरनार ट्रान्सपोर्ट गोडाऊन, बालाणी लॉन्स जवळ, एमआयडीसी जळगाव या कंपनीच्या गाडया ट्रान्सपोर्ट करीता लावल्याचे दाखवले. नंतर सदर गाडीचे भाडे देण्याबाबत लोखिंदर मोहरसिंगने त्याचे लॉगीन आयडी BO०३७१ वरुन कंपनीस खोटी रिक्वेस्ट आर. लॉजीक ने पाठवून वेळोवेळी कंपनीकडुन २६ लाख ३० हजार २०० रुपये व डिझेल भरण्याकरीता ९३ हजार रुपये व सिध्दार्थ ट्रान्सपोट, सिवाच रोड लाईन, गोगाजी कॅरीअरचे या कंपन्याचे भाडे १ लाख ४० हजार ५७५ रुपये कंपनीचे बि.पी.सी.एल. कार्डमधुन अदा केल्याचे दाखवून ते सदर कंपनीला न देता बी.एल.आर. लॉजीस्टीक इंडीया एलटीडी कंपनीची एकुण २८ लाख ६३ हजार ७७५ रुपयात फसवणुक केली. फसवुकीचा प्रकार समोर आल्यानंतर, सोमवार, २६ डिसेंबर रोजी या संदर्भात बीएलआर लॉजिस्टिक इंडिया कंपनीचे व्यवस्थापक मुकुल प्रेम कुमार शर्मा (वय ३५, रा. अयोध्या नगर) यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन लोखिंदर मोहरसिंग विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपासी सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल मोरे हे करीत आहेत.

Protected Content