लाभार्थ्यांना वात्सल्य योजनेचा लाभ त्वरीत देण्यात यावा; मनसेचे निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लाभार्थ्यांना वात्सल्य योजनेचा लाभ त्वरीत देण्यात यावा; मनसेचे निवेदन कोरोना काळात आईवडील गमावलेल्या मुला मुलींना वात्सल्य योजनेचा लाभ त्वरीत मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्र नविनिर्माण सेना महानगरच्या वतीने शुक्रवारी २८ जुलै रोजी दुपारी १ वाजता जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात जळगाव जिल्ह्यातील शेकडो घर उध्दस्त झाले आहे. काहींचे वडील, काहींची आई, तर काहींचे दोघेही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा अनाथ झालेल्या मुला मुलींना आर्थीक हातभार आणि शिक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने वात्सल्य योजना राबविण्यात आली होती. यात लाभार्थ्याला दर महिन्याला अकराशे रूपये मिळत होते. ही रक्कम काही महिन्यांपर्यत मिळाली. ती देखील आता बंद झाली आहे. शिवाय केंद्र सरकारच्या वतीने १० लाख रूपयांची मुदत ठेव योजनेसाठी जिल्ह्यातील ८४१ निराधार पाल्य पात्र झालेली आहेत. परंतू यातील काही मोजक्याच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला बाकी लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. तरी शासनाने या योजना तातडीने सुरू करून लाभार्थ्याला दर महिन्याला अकराशे रूपये देण्यात यावे आणि केंद्र सरकारच्या १० लाख रूपये ठेव योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी २८ जुलै रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष आशिष सपकाळे, जिल्हा संघटक राजेंद्र निकम यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content