जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 98 हजार जणांना कोरोना लसीकरण

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 98 हजार 711 लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात 6 लाख 97 हजार 800 जणांना पहिला डोस तर 2 लाख 911 जणांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज शनिवारी 17 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता यांनी पाठविलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे. 

शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले.  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी लस महत्वपूर्ण असल्याने आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी गर्दी करीत आहे.

कोरोना लसीकरणास नागरीकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांचे सहज व सुलभ लसीकरण व्हावे याकरीता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 97 हजार 800 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 2 लाख 911 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 8 लाख 98 हजार 711 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील 4 लाख 81 हजार 759 तर ग्रामीण भागातील 4 लाख 16 हजार 952 नागरीकांचा समावेश आहे. नागरीकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज शनिवारी सायंकाळी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!