लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुरज महाजन यांचे यश

ओबीसीत महाराष्ट्रातून सहावा क्रमांक

धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज, प्रतिनिधी | येथील प्राथमिक शिक्षक रमेश महाजन व सुमन महाजन यांचा मुलगा सुरज रमेश महाजन यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात २४ अंतिम परीक्षा उत्तीर्ण होत यश प्राप्त केले असून त्यांचा ओबीसीत महाराष्ट्रातून सहावा क्रमांक आला आहे.

2020 च्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सुरज रमेश महाजन हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 24 अंतिम परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे.तसेच इतर मागासवर्गीय (ओबीसी) मधे महाराष्ट्रातून सहावा क्रमांक आला आहे.

शिवसेना परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला, याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगरसेवक विनय भावे, विलास महाजन, अहमद पठाण, जितेंद्र धनगर, प्रशांत देशमुख, राहुल रोकडे, तोशिप पटेल, सोनू पटेल, अक्षय महाजन, जयेश महाजन, चेतन पाटील आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!