वनपाल यांचा अपघातानंतर उपचारा दरम्यान मृत्यू

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज, प्रतिनिधी | येथील वनविभागात ‘वनपाल’ या पदावर कार्यरत असलेले ४३ वर्षीय  असलम खान मजीद खान यांचे आज रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले आहे .

यावल येथील अक्सा नगर कॉलनीत राहणारे वनपाल असलम खान अमळनेर चोपडा मार्गावर यावल येत असतांना त्यांच्या मोटर सायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भिषण अपघात झाला होता व त्यांना डोक्यास गंभीर दुखापत झाली होती त्यात जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असतांना अडीच महीन्यापर्यंत त्यांनी मृत्युशी झुंज दिली.

आज बुधवार, दिनांक ११ मे रोजी त्यांचे दुदैवी निधन झाले. रावेर, यावल, चोपडा या सातपुडा वनक्षेत्रात सेवेत कार्यरत असतांना आपल्या कर्तव्याची जाणीव असणारे सर्वांना आपुलकीची व साध्यापणाची वागणूक देणारे अशी असलम खान यांनी आपली ओळख निर्माण केली होती.

त्यांच्या अशा दुदैवी मृत्युमुळे वनविभागात सर्वत्र दुखाचे सावट पसरले आहे . जळगाव येथे रात्री उशीरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार (दफनविधी) करण्यात आले. मयत असलम खान त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व चार बहीणी असा परिवार आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!