पाच लाखासाठी विवाहितेचा सासरी छळ

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द गावातील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी शेवगे येथे घर बांधण्यासाठी माहेराहून ५ लाखांची मागणी करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी २७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथील माहेर असलेल्या रूपाली गणेश महाजन यांचा विवाह पारोळा तालुक्यातील शेवगे येथील गणेश वसंत महाजन यांच्यासोबत रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नानंतर विवाहिता सासरी नांदत असतांना पती गणेश महाजन याने घर बांधण्यासाठी माहेराहून ५ लाख रूपये आणावे अशी मागणी केली.विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला शिवीगाळ करत छळ केला. तसेच सासू, सासरे, जेठ, नणंद आणि नंदोईभाऊ यांनी देखील शारिरीक व मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी हिंगोणा खुर्द येथे निघून आल्या. त्यानंतर शनिवार २७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती गणेश वसंत महाजन, सासू पार्वताबाई वसंत महाजन, सासरे वसंत अभिमन महाजन, जेठ जिजाबराव वसंत महाजन, नणंद योगिता गणेश महाजन, नंदोईभाऊ गणेश अर्जून महाजन सर्व रा. शेवगे ता. पारोळा, यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील हे करीत आहे.

Protected Content