अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा बसस्थानकाजवळ असलेले किरणा दुकान मध्यरात्री फोडून किराणा सामान व रोकड असा एकुण ४५ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भवरलाल पुरखाराम चौधरी (वय-३६) रा. सावखेडा ता. अमळनेर हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गावातील बसस्थानक जवळ त्यांचे किराणा दुकान आहे. १८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता त्यांनी किराणा दुकान बंद करून घरी निघून गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानच्या मागील पत्रा उचकावून आत प्रवेश करत दुकानातील किराणा सामान व रोकड असा एकूण ४५ हजार रुपये ८०० रुपये किमतीचा सामान चोरीला गेल्या १९ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी भवरलाल चौधरी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनिल पाटील करीत आहे.