Home क्राईम हॉस्पिटलसमोरून रूग्णाच्या नातेवाईकाची दुचाकी लांबविली

हॉस्पिटलसमोरून रूग्णाच्या नातेवाईकाची दुचाकी लांबविली

0
38


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका हॉस्पिटल समोरून १४ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रामचंद्र देवराम महाजन रा. हिवरखेडा बुद्रुक ता. जामनेर जि. जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील पल्स क्रिटी केअर हॉस्पिटल येथे रविवार २३ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता नातेवाईकांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ बीएल ५५२७) हॉस्पिटलच्या समोर पार्क करुन लावली होती. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची १४ हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. त्यांनी सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला परंतु दुचाकी ही कुठे आठळून आली नाही. अखेर रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन रितसर तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात २४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक अशोक बारी करीत आहे.


Protected Content

Play sound