जळगावात दोन मोबाईलसह रोकड लंपास; पोलीसात तक्रार

chori1

जळगाव, प्रतिनिधी । दोन अज्ञात चोरट्यांनी सर्वजण झोपलेले असल्याचा फायदा घेत घरातून दोन मोबाईल आणि साडेबारा हजार रूपये चोरून नेल्याची घटना आज पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात एमआयडीसी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील इच्छादेवीजवळ असलेल्या फुकटपूरा परीसरातील पंचशिलनगर येथील राहिवाशी पवन किसन हटकर (वय-35) हे मिळेल ते मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. रात्री उशीरा जेवण करून सर्वजण घरात झोपले असतांना याचा फायदा घेत दोन अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागच्या भागातून आत शिरत घरातील दोन मोबाईल आणि 12 हजार 500 रूपये चोरून नेले. ज्यावेळी चोरी झाली त्यावेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या छाया वसंत सुरवाडे यांना जाग आली. त्यांनी दोन भामटे मोबाईल चोरी व रोकड घेवून जातांना दिसून आले. त्यांनी गल्लीत आराडाओरड केल्याने गल्लीतील नागरीकांनी त्यांचा पाठलाग केला मात्र ते मिळून आले नाही.

भिशीच्या पैश्यातून घेणार होते सायकल
पवन हटकर यांची नुकतीच भिशी लागली होती. त्यात त्यांना 12 हजार 500 रूपये मिळाले होते. त्या पैश्यातून आज मुलाला सायकल घेणार होते. मात्र चोरट्यांनी रोकड लंपास केल्याने सायकल घेणे राहिले अशी प्रतिक्रिया हटकर यांच्या पत्नी राणी हटकर यांनी सांगितले.

Protected Content