मुंबईत डंपरने तिघांना चिरडले !

Accident

मुंबई (वृत्तसंस्था) लोअरपरळ येथे बावला मस्जिद समोर सोमवारी रात्री भरधाव वेगात असलेल्या डंपरने तिघांना चिरडले. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

लोअरपरळ येथे ना. म. जोशी मार्गावरील बावला मशीदजवळील मोनोरेल स्टेशनच्या पुलाखालून सोमवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास दारुच्या नशेत असलेला डंपरचालक भरधाव वेगाने जात होता. यावेळी त्याचे डंपरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे डंपरने गाड्यांना धडक द्यायलाय सुरुवात केली. त्यानंतर डंपरचालकाने तिथून पळ काढण्याच्या प्रयत्नात रस्त्यावरून चालणाऱ्या तिघा जणांना चिरडले. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Protected Content