वेले येथे पडोस युवा संसद कार्यक्रम उत्साहात

yawal news 4

चोपडा प्रतिनिधी । नेहरू युवा केंद्र संगठनातर्फे वेले येथील अमर संस्था संचालित बालगृहात २४ फेब्रुवारी रोजी पडोस युवा संसद हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. तालुका समन्वयक निलेश बाविस्कर आणि आकाश कोळी यांनी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

प्रथम स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांचे प्रतिमा पूजनाने करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चोपडा येथील कन्या माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक व्ही. पी.चौधरी हे उपस्थित होते. त्यांनी युवकांना निर्मल भारत स्वच्छ भारत विषयावर प्रकाश टाकत सांगितले की स्वच्छतेची सुरुवात घरापासून करावी. आपल्या घरातील आपली आई स्वच्छतेची प्रतीक असते. ती मनापासून आपले घर आणि दार स्वच्छ ठेवत असते आणि कुणाला बोलत पण नाही.ह्या विचारातून आपण स्वयं स्वच्छता अंगिकारली पाहिजे. स्वच्छता करण्यास आपण शाब्दिक नको तर कृतीतून सहभाग घ्यावा. तसेच त्यांनी मुंबई मनपा आयुक्त यांचे कचरा व्यवस्थापनाचे उदाहरण दिले. गड किल्ले स्वच्छता याची माहिती विविध प्रकारचे उदाहरण देऊन पटवून दिले.

या एकदिवसीय एक दिवसीय शिबिरात चार व्याख्याते होते. यानंतर वडती येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक राजेश चौधरी यांनी युवकांना जलयुक्त शिवार तसेच एक भारत श्रेष्ठ भारत या दोन विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच चोपडा येथील बालमोहन विद्यालयाचे उपशिक्षक मयुरेश्वर रोहिदास सोनवणे यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ हा विषय युवकांना समजावून सांगितला त्यांचे समाजावरील परिणाम आणि महत्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाला अमर संस्थेचे बालगृहचे व्यवस्थापक शेषराव पाटील, निलेश पाटील, जितेंद्र पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाची शेवटी आभार आकाश कोळी यांनी मानले.

Protected Content