हिंगोणा गावात भीषण पाणी टंचाई ; आमरण उपोषणाचा इशारा

0e0ddab0 5519 4191 a253 6b6bd6c6c71d

 

यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणा गाव मागील एक वर्षापासून भीषण पाणी टंचाईला सामोरे जातेय. या विरोधात आज संतप्त नागरिकांनी १५ दिवसात पाणी टंचाईवर मार्ग न निघाल्यास तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांना आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष जीवन अरूण तायडे हे आमरण उपोषणास बसणार असल्याचे लेखी निवेदन यावलचे माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली आज सकाळी देण्यात आले.

 

 

या संदर्भात जिवन तायडे व अनेक महीला कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, हिंगोणा ग्राम पंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे ४५ अंश अशा भयानक तापमानात हिंगोणेकरांना भिषण पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. शासकीय पातळीवर मंजूर झालेल्या मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याच्या कामासाठी ४७ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. एवढेच नावेह तर, या योजनेच्या माध्यमातुन जलकुंभ आणि जलवाहीनीचे कामे सुरु आहेत. संभाव्य पाणीटंचाईचा दृष्टिकोण समोर ठेवून परिसरातील विहीर किंवा ट्युबवेलचा या योजनेत समावेश करून घेण्यात यावा. एकेकाळी महाराष्ट्र राज्यात आर्थिकदृष्ट्या श्रीमंत व सक्षम अशी ओळख असलेल्या हिंगोणा या ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात मुबलक पाणीपुरवठा होईल, अशा ५ विहीरी असून देखील ग्राम पंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे गावातील पाण्याचा प्रश्न हा अतिश्य गंभीर बनला आहे. हिंगोणा गावातील ग्रामस्थांना ४५ दिवसातुन एकच वेळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने गावात बाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

 

तसेच ग्राम पंचायतीच्या माध्यमातून पंचायतची शेती ही शेती खडाने ( हिश्श्याने) दिली आहे. याची देखील चौकशी करण्यात यावी. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने १४ व्या वित्तीय आयोगाच्या निधीतून सन २०१६ते २०१८ या कालावधीतील झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी. त्याचप्रमाणे ग्राम पंचायतही ग्रामसभेमध्ये विषय न घेता कृती आराखड्यात वारंवार बदल करून चुकीचे काम करीत आहे. तरी तात्काळ या ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराची तात्काळ चौकशी करून कार्यवाही करावी. अन्यथा पंधरा दिवसानंतर आपण आमरण उपोषणा बसणार असल्याचे श्री. तायडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

 

यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना दिलेल्या निवेदनावर जिवन अरूण तायडे, बबन धोंडु तायडे, शेख जाकीर शेख रऊफ, शेख शरीफ शेख लतीफ, आशा कैलास भालेराव, सवर्णा सतिश तायडे, कैलास रुपचंद भालेराव, कल्पना तायडे, शीला शशीकांत तायडे, अक्षय सुरेश भालेराव, शाहीनाबी शेख शरीफ, जरीनाबी शेख रऊफ, आशा सुरेश तायडे, शेख फारूख शेख हारून, सबनुरबी शेख हारून यांच्या स्वाक्षरी असून या निवेदनाच्या प्रति यावल पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी किशोर सपकाळे आणि ग्रामीण पाणी पुरवठयाचे अभीयंता सुरवाडे यांना देखील देण्यात आल्या आहेत.

Add Comment

Protected Content