खासगी डॉक्टर्सनी जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे- प्रांताधिकारी

यावल प्रतिनिधी । कोरोना सारख्या आपत्तीमध्ये खासगी डॉक्टर्सनी जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले. ते शहरातील खासगी डॉक्टर्स सोबतच्या बैठकीत बोलत होते.

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभुमीवर परिस्थितीचे गांभीय लक्षात घेवुन विभागाचे प्रांत अधिकारी डॉ अजीत थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहरातील खाजगी डॉक्टर्स यांची महत्वाची बैठक तहसील कार्यालयाच्या दालनात पार पडली. यावेळी प्रांत अधिकारी डॉ अजीत धोरबोले यांनी कोरोना विषाणुच्या वैद्यकीय उपचारासंदर्भात खाजगी डॉक्टर्सनी आपले कर्तव्य व सामाजीक बांधीलकीच्या माध्यमातुन अधिक जबाबदारीने जागृत राहुन रुग्णांवर उपचार करून सेवा करावी तरच आपण याकोरोना सारख्या घातक आजारावर नियंत्रण मिळवु असा आत्मविश्‍वास व्यक्त केला. या बैठकीस तहसीलदार जितेन्द्र कुवर, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मानिषा महाजन यांच्यासह डॉ. मनोज वारके, डॉ. वसीम खान , डॉ. तुषार फेगडे , डॉ .पराग पाटील , डॉ इसरार खान आदींसह अन्य डॉक्टर्स उपस्थित होते.

Protected Content