रिद्धी, सिद्धीच्या डोळ्यांवर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार

जळगाव प्रतिनिधी । अवघ्या दोन महिन्यांची रिद्धी साडेसातमाशी असतांनाच जन्माला आली. वजनही कमीच भरले. अशा या गोड-गोंडस परीची संपूर्ण अवयवांची वाढ झाली नाही त्यात डोळ्यांद्वारे ती आपल्या आईला नीटसे पाहूही शकत नव्हती. मात्र डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात एकाच छताखाली विविध स्पेशालिस्ट डॉक्टर्स उपलब्ध असतात. त्यात रेटिना तज्ञ असलेल्या डॉ.अश्‍विनी पाटील यांच्याकडे चिमुकल्या रिद्धीला दाखविले असता त्यांनी लेजर करावे लागेल असे सांगितले आणि लेजर उपचाराने चिमुकली रिद्धीसह तिची बहिण सिद्धीलाही सृष्टी दिसू लागली आणि हे पाहून तिच्या आई-वडिलांचा डोळ्यात आनंदाश्रु तराळले.

जळगावजवळील शिरसोली येथील रहिवासी असलेले दिगंबर लावणे यांच्या पत्नीची प्रसृती २७ जुलै रोजी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वीरित्या झाली. मात्र नऊ महिने नऊ दिवस भरले नाही, अवघ्या साडे सात महिन्यातच प्रसुती होवून दोन कन्यारत्न जन्मास आले. जन्माला आल्यावर दोघींचे वजनही कमी भरले आणि त्यातील रिद्धीला तात्काळ रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये व्हेंटीलेटरवर उपचारार्थ ठेवण्यात आले. एनआयसीयूतील डॉ.सुयोग तन्नीरवार यांच्यासह इंटर्न डॉ.रोहन दोषी, डॉ.प्रज्ञिल यांच्यासह नर्सिंग स्टाफचे सहकार्य आणि दैव बलवत्‍तर असल्याने तब्बल ५७ दिवसांनंतर व्हेंटीलेटरवरील ते बाळ सुखरुप परत आले आणि तिच्या जन्मदात्यांच्या जीवात जीव आला. दरम्यान त्या जुळ्या मुलींचे बारसे झाले आणि रिद्धी-सिद्धी असे त्यांचे नामकरण करण्यात आले, यातील ती रिद्धी… रिद्धीचे वजनही खुप कमी होते आणि डोळ्याच्या पडद्याची वाढ कमी असल्याचे डॉक्टरांना जाणवले आणि त्यांनी रुग्णालयातीलच रेटिना तज्ञांकडे तपासून येण्याचा सल्‍ला दिला.

दरम्यान दिगंबर लावणे हे आपल्या चिमुकल्या रिद्धी आणि सिद्धीला घेऊन रेटिना विभागात आले, याप्रसंगी डॉ.अश्‍विनी पाटील यांनी बाळाला तपासले. दरम्यान बाळाच्या डोळ्यातील पडद्याची स्थिती आणि रक्‍तवाहिन्यांची न झालेली वाढ हे ओळखले. त्याला रेटिनो पॅथो प्रिमॅच्युरीटी असे शास्त्रीय भाषेत संबोधले जाते. याप्रसंगी दोन महिन्यांच्या रिद्धी आणि तिची बहिण सिद्धी या दोघींवर ४ आठवड्यात लेजर उपचार करण्यात आले आणि त्यानंतर रिद्धी आणि सिद्धीला योेग्य दृष्टी मिळाली आणि त्या सभोवतालच्यांना न्याहळू लागली, त्याबद्दल रिद्धी आई-वडिल यांनी डॉक्टरांसह रुग्णालयाचे आभार मानले.

लेजर उपचारामुळे दृष्टी वाचण्यास मदत 

प्रि-मॅच्युअर बेबींमध्ये अनेकदा बाळांना दृष्टीदोष निर्माण होतो. यात बाळाचे वजन २ किलो पेक्षा कमी आणि बाळ आठ महिन्याआधी जन्माला आले असेल तर त्या प्रत्येक बाळाची डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात तज्ञांकडून स्क्रिनिंग केली जाते. दोष असल्यास लेजर सारख्या उपचारांनी बाळांची दृष्टी ९० ते ९५ टक्के वाचविली जाते. लेजर उपचारानंतर वेळोवेळी बाळांना फॉलोअपसाठी आणले गेले पाहिजे, यामुळे अन्य कुठलीही समस्या तर उद्भवत नाही ना त्याची माहिती होते. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात एकाच छताखाली ह्या सर्व सुविधा उपलब्ध आहे.

 

Protected Content