पाचोरा शहरात आढळला अजून एक कारोना बाधीत रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । पाचोरा शहरात अजून एक नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून या शहरात कोरोनाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील सर्वाधीक कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण असणार्‍यांमध्ये पाचोर्‍याचाही समावेश आहे. या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयाने आज रात्री जाहीर केलेल्या प्रेस नोटमध्ये एक बाधीत आढळ्याचे नमूद केले आहे. या प्रेस नोटनुसार-पाचोरा येथे स्वॅब घेतलेल्या चार कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आता प्राप्त झाले आहे. त्यापैकी तीन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर एक 20 वर्षीय महिलेचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. या सर्व व्यक्ती भीमनगर, पाचोरा येथील रहिवासी आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 126 इतकी झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content