बांधकामाचे साहित्य चोरी करणारे अटकेत

भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असणार्‍या पुलाच्या बांधकामाचे साहित्य चोरी करणार्‍या दोघांना पोलिसांनी गजाआड केली आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील नागेश्‍वर मंदिरा समोर दुर्गा सेक्युरटी भुसावळ या नावाच्या सेक्युरटी मध्ये सुपरवाईजर म्हणुन काम पाहणारे निलेश कडु वानखेडे हे तेथे जावुन तेथील पुलाच्या बाधकामाचे साहीत्य चेक करत असतांना त्यांना ५ पाईप व ४ अँगल चोरीस गेल्याचे आढळून आले. या प्रकरणी त्यांनी पोलिसात फिर्यादी दिली असता याच ठिकाणी रात्रपाळीस सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे तेजस गोपाळ अत्तरदे (वय – ३० रा.लक्ष्मी नगर वांजोळा रोड भुसावळ ) आणि रुपेश बेंजामीन पातोळे (वय – २९ रा.दत्त नगर वांजोळा रोड भुसावळ ) यांनी चोरी केल्याचे निदर्शनास आले. या अनुषंगाने पो.स्टे ला भाग ५ गु.र.न ३९३/२०२० भा.द.वि.क.३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित तेजस गोपाळ अत्तरदे व रुपेश बेंजामीन पातोळे यांना भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने अटक केली.

Protected Content