सावद्यात भाजपला धक्का : नगराध्यक्षांसह बहुसंख्य नगरसेवक राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर !

सावदा, ता. रावेर जितेंद्र कुलकर्णी | येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत भाजपच्या नगराध्यक्षा अनिता येवले यांच्यासह सर्व नगरसेवकांनी हजेरी लावल्याने येथे पक्षाला धक्का बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आजवर पत्ते खुले न करणार्‍या नगराध्यक्षा व नगरसेवकांनी आपली भूमिका जाहीर केली असून याचा आगामी नगरपालिका निवडणुकीवर परिणाम होणार असल्याचे मानले जातआहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आज जेहरा मॅरेज हॉल येथे आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीत ना.अजितदादा पवार यांच्या आगामी संपर्क दौर्‍याबाबात विचार विनिमय करणे. शहरातील विविध पदाधिकारी व कार्यकर्तेचा पक्ष प्रवेश व सत्कार.पक्ष कार्यकारणीचा आढावा आणि शहरात शाखा उदघाटन बाबतचे कार्यक्रम ठरविणे यावर चर्चा होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे हे या आढावा बैठकीला संबोधित करणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अरूण पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, गटनेते फिरोजखान पठाण, भुसावळचे नगरसेवक प्रा. सुनील नेवे, किसान सेलचे सोपान पाटील आदी मान्यवर उपस्थित आहेत.

सावदा येथील नगराध्यक्षा अनिता येवले या नाथाभाऊंच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. मात्र त्या आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आजवर आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नव्हती. या पार्श्‍वभूमिवर, आज त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर हजेरी लावल्याने आता त्यांची आगामी वाटचाल ही राष्ट्रवादीच्याच माध्यमातून होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत याचा मोठा परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: