नायगाव ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच अवघ्या पाच दिवसांत अपात्र

मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच प्रमिला मनोहर पाटील यांना अवघ्या पाच दिवसांत अपात्र घोषित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 14 (ज) (3) नुसार हा निर्णय घेतला आहे.

नायगावच्या सरपंच सुपडाबाई भालेराव या सुट्टीवर गेल्यामुळे 27 मार्च 2025 रोजी प्रमिला मनोहर पाटील यांच्याकडे प्रभारी सरपंच पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, 5 दिवसांतच त्यांना अपात्र ठरविण्यात आल्याने ग्रामपंचायतीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी ग्रामपंचायतीचे तीन सदस्य अपात्र ठरले होते, तर प्रमिला पाटील या चौथ्या अपात्र ठरलेल्या सदस्या ठरल्या आहेत. सततच्या अपात्रतेच्या निर्णयामुळे गावकऱ्यांमध्ये संभ्रम आणि चर्चेला उधाण आले आहे.

Protected Content