सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयातर्फे वृक्षारोपण उत्साहात

chalisgaon news

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई कुडे विद्यालयाच्या वतीने परिसरात वृक्षलागवड करण्यात आले. शाळेतील हरित सेना या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शाळे लगत वृक्षलागवड करण्यात आले. जेणेकरून शाळेच्या परिसर प्रसन्न, स्वच्छ हिरवळीने फुलून यावा या उद्देशाने नागरिकांच्या हस्ते याप्रसंगी वृक्ष लागवड करण्यात आले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
प्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विक्रमादित्य पाटील, डी. व्ही. बिरारी, तसेच हरित सेनेचे प्रमुख किशोर चौधरी, डी.आर. चव्हाण, महेश आहेराव, कैलास माळी, के .जे. पवार, एस .एल .सूर्यवंशी, एस. वाय .पारखे, आर .डी. महाजन, जे. एम. पाटील, आर. जी. देवरे, ए .डी. पाटील, एम.एस परदेशी, एन. पी .वाणी, भैय्या महाजन तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Protected Content