यावल तालुक्यात संततधार पावसामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ

yaval 1

यावल प्रतिनिधी । तालुक्यात संततधार पावसामुळे परिसरात मोठया प्रमाणावर बदल झाल्यामुळे हिवताप, सर्दी आणि खोकला असलेल्या रुग्ण आढळून येत आहेत. तसेच या आजारातील संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, तालुक्यात विविध ठिकाणी व परिसरात मागील 8 ते 10 दिवसांपासुन सर्वत्र संततधार पाऊसाची रिपरिप सुरू असल्यामुळे परिसरातील वातावरणात कमालीचे बदल झाले आहेत. ह्या बदल्याच्या वातावरणाचाच परिणाम नागरिकांवर झाल्याचा दिसून येत आहे. याकरीता नागरीकांनी आपल्या आरोग्याविषयी काळजी घेण्यासाठी आपल्या घरातील व छतावर पाऊसाचे पाणी साचणार नाही व त्यामुळे डासांची निर्मिती होणार नाही, याची अधिक काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावरील अन्नपदार्थ खावु नये, घरात स्वच्छता असावी. घराच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य तयार होणार नाही याची काळजी घ्यावी. मुलांनी पावसाचे साचलेले डबक्यात जाऊ नये. नागरिकांनी अशी आपली आरोग्याची काळजी घ्यावी, अशी सूचना वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे.

Protected Content