मारुळ ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात ग्रामस्थांचे निवेदन

yaval nivedan 1

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मारूळ गावाच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या दुर्लक्षीत व भोंगळ कारभारामुळे गावातील विविध समस्यांचे डोंगर वाढल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या समस्या तात्काळ सोडविण्यात यावे. अश्या मागणीचे निवेदन ग्राम पंचायत सदस्यांनी प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांना दिले आहे.

या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील मौजे मारूळ हे गाव सुमारे १२ हजार लोकवस्तीचे असुन, येथील ग्राम पंचायत करीता नेमणुक केलेले ग्रामसेवक हे मागील 3 महिन्यापासून येत नसल्याने गावातील समस्यांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. पावसाळ्याचे दिवस असुन गावात साफसफाई होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मारूळ गावाच्या समस्यांकडे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी पुर्णपणे दुर्लक्ष केल्याने गावातील ग्रामस्थमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गावात सर्वत्र अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरल्या ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, व या परिस्थितीमुळे काही प्रकार घडल्यास ग्राम पंचायत प्रशासन जबाबदार राहील. गावातील समस्यांचे तात्काळ निराकरण न झाल्यास लोकशाही मार्गाचा अवलंब करण्यात येईल असे तक्रार निवेदनात नमुद करण्यात आले आहे. त्याचबरोबर, ग्रामपंचायत सदस्य अकीलउद्दीन अमीरूद्दीन, कबीरूद्दीन जहीरूद्दीन, प्रवीण भानुदास हातकर, एकनाथ दिनकर मराठे, यांच्यासह असलम वसीउद्दीन सैय्यदअली हुसैनअली, लियाकत अली राजाअली यांच्यासह आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Protected Content