भारतीय संघात संजू सॅमसनला संधी

Sanju Samson

 

मुंबई वृत्तसंस्था । येत्या ६ डिसेंबरपासून होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून भारताचा सलामीवीर आणि गब्बर म्हणून ओळख असलेल्या शिखर धवनला डच्चू देण्यात आला आहे. धवनच्या जागी युवा खेळाडू संजू सॅमसनला संधी देण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने ट्विट व्दारे दिली आहे. मात्र, सॅमसनला मैदानावर उतरण्याची संधी मिळणार का? अशी चर्चा सध्या क्रिकेटवर्तुळात रंगली आहे.

सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आहे. धवनच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागी संजू सॅमसनची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेसाठी मूळ संघ जाहीर करण्यात आला होता पण त्या संघातून संजू सॅमसन याला वगळण्यात आले होते. देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएल अशा दोनही ठिकाणी चांगली कामगिरी करून देखील संजू सॅमसन भारतीय संघात संधी नाही, यावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. पण शिखर धवनची दुखापत संजू सॅमसन याच्या पथ्यावर पडली आणि त्याचा संघात समावेश करण्यात आला. अशा परिस्थितीत दुखापतग्रस्त खेळाडूला पर्याय म्हणून बदली खेळाडू सॅमसनला मैदानावर उतरण्याची संधी मिळणार का? अशी चर्चा सध्या क्रिकेटवर्तुळात रंगली आहे.

Protected Content