शहीद जवानांना निमगव्हाणकरांनी वाहिली श्रद्धांजली

tapi foundation

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील निमगव्हाण येथील तापी फाऊंडेशनतर्फे आज (दि.२६) सायंकाळी ६ वाजता गावातील महर्षी वाल्मिक चौकात २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

तापी फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल बाविस्कर यांनी प्रास्ताविकेतून २६/११च्या हल्ल्यावर प्रकाशझोत टाकली व शहीद जवानांसह पोलीस बांधवांच्या कार्याची माहिती दिली. शालेय विद्यार्थ्यांनी टीना बाविस्कर व दुर्गा पाटील यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून शांतीमंत्र म्हणत पुष्प अर्पण करून शहीद पोलीस व जवानांना श्रध्दांजली अर्पण केली.

या कार्यक्रमाला उपसरपंच ज्योती कोळी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धनराज बाविस्कर, पोलीस पाटील पवन भिल, ग्रामपंचायत सदस्य संभाजी पाटील, संतोष त्र्यंबक बाविस्कर, ज्येष्ठ नागरिक पदमाकर सोनार यांच्यासह गावातील विविध सामाजिक व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तापी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष दिपक बाविस्कर, सदस्य प्रदीप बाविस्कर, संजय बिऱ्हाडे, रुपेश साळुंखे, रोहन बाविस्कर, जयेश बाविस्कर, प्रशांत पाटील, मितांशू बाविस्कर, मयूर बाविस्कर, दिपक भानुदास बाविस्कर, नरेंद्र बाविस्कर, वकील बाविस्कर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बिऱ्हाडे यांनी केले.

Protected Content