फैजपूर येथे दुर्गामाता दौडची आज सांगता

 

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | फैजपूर शहरात गेल्या दहा दिवसापासून दररोज सकाळी सहा वाजता दुर्गामाता दौडची सुरुवात आई तुळजाभवानी मंदिरापासून होत असे या दुर्गामाता दौडची सांगता आज विजयादशमी निमित्त महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

शहरात घटस्थापने पासून ते विजया दशमी पर्यंत दहा दिवस दररोज सकाळी सहा वाजता पुरातन आई तुळजाभवानी मंदिरापासून दुर्गामाता दौंडला सुरुवात होत असे, दररोज एक मंदिरा भेट देऊन गावात दुर्गामातादौड केली जात होती. यात लहान मुलांपासून महिला, पुरुष, तरुण व तरुणी या दुर्गामाता दौंड मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असत आज विजयादशमी निमित्त विशेष दुर्गामाता दौड काढण्यात आली. यात लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी भगवे फेटे परिधान केले होते.गावातील कासार गल्ली येथील श्री कालिंका माता मंदिर येथे दुर्गामाता दौडची सांगता करण्यात आली यात महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांची उपस्थिती होती.

या दुर्गामाता दौडचे आयोजन विनोद गलवाडे, प्रविण कोष्टी, चेतन गलवाडे, योगेश सोनवणे, प्रशांत मिस्तरी, राहुल भोई, लोकेश कोल्हे, चेतन बोरोले, बंडू सरोदे, निखिल भावसार, निरज झोपे, जितू जोगी, जितू कोल्हे, महेश वाघोदे कर, शुभम सोनवणे, मेघश्याम चौधरी, सिद्धेश नेहेते, राहुल चौधरी, यांनी सहकार्य केले.

Protected Content