नाणिज वारीसाठी स्वखर्चाने पाठवले भाविक -मंगेश चव्हाण

nanij vari

चाळीसगाव प्रतिनिधी । आषाढी एकादशीनिमित्त तालुक्यातील भाविकांना विठ्ठलाचे दर्शन व्हावे या हेतूने मंगेश चव्हाण यांनी स्वखर्चा ३ हजार वारकऱ्यांना पंढरपूरची वारी करून आणले असून लगेच गुरु-पौर्णिमेनिमित्ताने जवळपास ७० ते ७५ भाविकांना नाणीज आश्रमात दर्शनासाठी दि. १४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता रवाना केले आहे.

यावेळी पवारवाडी स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिरात स्वरूप सांप्रदाय तालुकातील सेवा समितीच्या भाविकांना निरोप देण्यापूर्वी युवा उद्योजक मंगेश चव्हाण म्हणाले की, मागील जन्माचे पुण्य माझ्याकडे संचित असेल म्हणूनच तुम्हाला नाणीज वारी घडविण्याचा योग आला. भाजपाचा छोटासा कार्यकर्ता असून माझे घर अध्यात्मिक क्षेत्रातील असल्यामुळेच लहानपणा पासूनच माझा कल आध्यात्माकडे आहे. माझ्या हातून जगद्गुरु स्वामी नरेंद्र महाराजांच्या दर्शनासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त पाठविण्याचे पुण्य लाभले आहे. तसेच तुम्ही देखील भाग्यवान आहेत नरेंद्र महाराजांचे दर्शन होणार आहे. तालुकातील दुष्काळ मुक्त होऊ दे, चांगले आरोग्य लाभू दे, हीच मागणी नरेंद्र महाराजांकडे करा असे सांगून भविष्यात देखील अशाच प्रकारे भाविक भक्तांच्या माध्यमातून पुण्याचे काम करीत राहील असे सांगून भक्तांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर रत्नागिरी येथे दि १६ जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त होणाऱ्या नाणिज वारी उत्सवासाठी स्वरूप सांप्रदाय तालुका सेवा समिती तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, युवा तालुका अध्यक्ष आबा जगताप, महिला तालुका अध्यक्ष मंगला पाटील, युवा धर्मक्षेत्र प्रमुख चेतन जगझाप, खजिनदार संजय चौधरी, रोहिणी संत संघ अध्यक्ष नंदू झाडे, संत संघ अध्यक्ष रोहिदास पाटील आदींसह स्वरूप सांप्रदाय तालुका सेवा समितीचे भक्त रवाना झाले आहेत. याप्रसंगी नगरसेवक चंद्रकांत तायडे, रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, ज्ञानेश्वर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले असून नगरसेविका विजया पवार, नगरसेवक सोंमसिंग राजपूत, भास्कर पाटील, प्रतिभा चव्हाण, कावेरी पाटील, भिकन पवार, पप्पू राजपूत, शांताराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीवितेसाठी सागर सूर्यवंशी, जगदीश चव्हाण अदिने परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब पवार तर आभार प्रदर्शन गणेश पवार यांनी मानले.

Protected Content