ब्र. संत जगन्नाथ महाराज यांचा २२ वा पुण्यतिथी महोत्सव निमित्त सत्संगाचे आयोजन

फैजपूर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  । महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांचे गुरु  ब्रम्हलीन संत  जगन्नाथ जी महाराज यांची २२ वी पुण्यतिथी सोहळा  दि. १० डिसेंबर ते १३ डिसेंबर २३ दरम्यान मोठ्या पाण्याच्या टाकीजवळ संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत  अमृतवाणी  सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी काकडा, संध्याकाळी हरिपाठ  सद्गुरु गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था नायगव्हाणचे दोनशे विद्यार्थी व अध्यक्ष रवींद्र महाराज महाले तसेच राष्ट्रीय संयुक्त महामंत्री अखिल भारतीय संत समिती  महामंडलेश्वर राधे राधे बाबा,  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय संत समिती गोपाल चैतन्य जी महाराज, महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज, आचार्य मानेकर बाबा शास्त्री, शास्त्री भक्तीकिशोर दासजी, स्वरूपानंदजी महाराज डोंगरदे, कृष्णगिरी महाराज, प. पू. श्याम चैतन्यजी महाराज जामनेर, रवींद्र महाराज हरणे मुक्ताईनगर, सतपंथ मुखी परिवार महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश येथील भाविक भक्त व संत महात्मा यांचे सानिध्यात होणार आहे.

दिनांक १३ डिसेंबर रोजी दुपारी दोन ते चार वाजता  ब्र. गुरुदेव जगन्नाथजी महाराज यांची पुण्यतिथी महापूजा होणार आहे. दिनांक १४ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता शोभायात्रा. सकाळी नऊ वाजता समाधीस्थळी पादुका पूजन आहे. सकाळी दहा ते दुपारी एक धर्मसभा  व दुपारी एक ते चार महाप्रसाद  पूर्वाचार्यांच्या समाधी स्थळी मंदिराचे शेतात होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थिती द्यावे असे आवाहन महामंडलेश्वर जनार्दन हरि जी महाराज सतपंथ मंदिर संस्थान यांनी केले आहे.

Protected Content