देवेंद्र फडणवीस यांना पश्चाताप होणारच : मनोज जरांगे यांचे आव्हान

नांदेड-वृत्तसेवा | मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकास्त्र सोडत त्यांना आव्हान दिले आहे.

आज नांदेड जिल्ह्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी मराठा समाजाची बाजू लावून धरली आहे. सरकार ते किती गांभिर्याने घेतात, हे मला माहित नाही. आमच्या लेकरांचं हित आमच्यासाठी महत्वाचं आहे. २४ डिसेंबरपर्यंत सरकार काय करत ते पाहू आमचं लक्ष आहे. यांनी काय आश्वासन दिलं आहे, हे आम्हाला माहित आहे. आपल्या लेकरांच्या बाबतीत हे विधिमंडळ मध्ये काय मांडतात. याकडे आमचं लक्ष आहे. जर २४ डिसेंबरपर्यंत निर्णय झाला नाही. तर यांच्यात लक्षात येईल आम्ही काय आहे ते, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, आमचं आंदोलन शांततेत होणार. पण तेव्हा यांना एवढा पश्चाताप झालेला नसेल एवढा होईल.देवेंद्र फडणवीस त्यांच्या मूळ भूमिकेवर येतील. ते खर्‍या आणि पूर्वीच्या भूमिकेवर येतील. त्यांनी एकट्याचा दबाव घेऊ नये. आरक्षण मिळवण्याची ताकद सामान्य माणसात आहे. पांढरे कपडे घालणार्‍यांमध्ये नाही. अशा माणसाने वयाचा विचार करून बोललं पाहिजे. दंगलीच्या गोष्टी करू नयेत. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये. त्याचा एकल्याचा पश्चातप देवेंद्र फडणवीस यांना होईल, अशी टिका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

Protected Content