वंचित बहुजन आघाडीची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; यादीत ११ जणांची नावे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीकरता वंचित बहुजन आघाडीच्या ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी देखील वंचितने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचे नाव जाहीर करण्यात आलं होत.

अशी आहेत ११ जणांच नावे
हिंगोलीतून डॉ. बी.डी चव्हाण, सोलापुरमधून राहुल गायकवाड यांना उमेदवारी तर माढ्यातून रमेश बारस्करांना उमेदवारी दिली. यापूर्वी देखील वंचितने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर यांचं नाव जाहीर करण्यात आले होते. ते अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढणार आहे. तर दुसऱ्या यादीत लातूरमधून नरसिंग उदगीरकर, साताऱ्यातून मारूती जानकर, धुळ्यातून अब्दुर रेहमान, हातकणंगले येथून दादासाहेब पाटील, रावेरमधून संजय ब्राम्हणे, जालन्यातून प्रभाकर बकले, मुंबई उत्तर मध्य येथून अब्दुल हसन खान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून काका जोशी हे लोकसभा निवडणूक लढवणार आहे.

Protected Content