रामदेववाडीकरांचा मतदानावर बहिष्कार; अंगणवाडीसेविकेच्या अपघाती मृत्यू झाल्याचा निषेध

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हयात १३ मे रोजी लोकसभेच्या निवडणूकीसाठी चौथ्या टप्प्यात मतदान घेण्यात आले. परंतू रामदेव वाडीतील अंगणवाडी सेविकेचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे तेथील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. काही दिवसांपूर्वी जळगावमधील रामदेववाडीजवळ अपघात झाला होता.

या अपघातात भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील महिला व तिच्या तीन बालकांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर रामदेववाडी गावातील गावकऱ्यांनी याबाबत संताप व्यक्त केला होता. आता गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकत विरोध व्यक्त केला. संशयिताना शिक्षा झाली नाही, आमच्या अन्याय झाला आहे. अशी भावना गावकऱ्यांची आहे. गावातील परिस्थिती पाहता मतदान केंद्रावर दंगारोख पथक तैनात करण्यात आले होते.

 

Protected Content