पांडे चौकात पाठलाग करून चोरीची दुचाकी पकडली

two wheelar thift 1

जळगाव प्रतिनिधी । दुचाकीचा क्रमांक पाहताच ती चोरीची असावी, असा संशय बळावला आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील प्रशांत पाठक यांनी तब्बल तीन किमी पाठलाग करून दुचाकीवरून दोघांना पकडून जाब विचारताच ती दुचाकी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झालेल्याचे निष्पन्न झाल्याचे उघडकीस आले असून दुचाकी ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की, २१ मे २०१९ रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका पोलीस कर्मचाऱ्‍याची (एम.एच.19 सी.क्यू़. १९२१) क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी पिंपळगाव हरे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यातही माहिती देण्यात आली होती. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रशांत पाठक हे त्यांच्या दुचाकीने खाजगी कामानिमित्त स्वातंत्र्य चौकाकडून पांडे चौकाकडे जात होते. त्यावेळी त्यांना एम.एच.१५ जी २ क्रमांकाची दुचाकी दिसली़ दुचाकीचा क्रमांक पाहताच त्यांना ही दुचाकी चोरीची असावी, असा संशय बळावला. त्यांनी त्वरित त्या दुचाकीचा पाठलाग केली. तब्बल 3 किलोमीटरपर्यंत पाठलाग करून दुचाकीवरून दोघांना पकडून विचारपूस केली असता त्यांनी मित्राची दुचाकी असल्याचे सांगितले. नंतर कसून चौकशी केली असता त्या दोघांच्या मित्राने ती दुचाकी चोरी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

Protected Content