अट्टल दुचाकी चोर गजाआड ; चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी

877f1a00 9444 4785 a0db 624ee67b7a59

चाळीसगाव (प्रतिनिधी) मागील काही दिवसापासून शहरासह ग्रामीण भागातून दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. त्यानुसार शोध पथकाने  सापळा रचून एका अट्टल दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे त्याने चाळीसगाव बाहेर देखील अनेक दुचाकी चोरल्या होत्या. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या तब्बल १४ दुचाकी जप्त केल्या आहेत.

 

या संदर्भात अधिक असे की, राजेंद्र खंडू पवार (रा.टाकळी ता.चाळीसगाव)यांची दुचाकी (क्रं एमएच १९ सीपी १९९२) ही २० ते २१ मेच्या दरम्यान, चोरीला गेली होती. या संदर्भात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, विभागीय पोलीस अधिकारी उत्तम कडलग, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी पोहेकॉ बापू भोसले, अभिमान पाटील,राहुल पाटील, विजय शिंदे,नितीन पाटील,संदीप तहसीलदार,प्रेमसिंग राठोड, प्रवीण सपकाळे गोपाल बिराजदार,तुकाराम चव्हाण,गोवर्धन बोरसे,राहुल गुंजाळ,संदीप पाटील,भगवान माळी यांचे एक पथक तयार केले होते. सदर पथक दुचाकी चोराचा शोध घेत असतांना गुप्त खबरीकडून माहिती मिळाली की, एक तरुण नागदरोड मार्केट जवळ एक विना नंबरची दुचाकी विकत आहे. तसेच त्यांच्या हालचाली देखील संशयास्पद आहे. पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठत सापळा रचला. थोड्याच वेळात जाळ्यात अडकताच त्याला खाक्या दाखविताच त्याने सर्व हकीगत सांगितली. त्यानुसार त्याची ओळख जय शरद पवार (वय २० रा. पारखडकी ता.चाळीसगाव) अशी सांगितली. त्याने आतापर्यंत विचन फाटा येथून १, मनमाड रेल्वे पुलजवळून २, नांदगाव रेल्वे स्थानकाहून ३, जळगाव रेल्वे स्थानकाहून १ शन येधुन -१, गिरणा डॅम येथून २, लासलगाव रेल्व स्थानकाहून १, कजगाव व नाशिक येथून प्रत्येकी १ मोटार सायकल चोरली होती. तर आठवत नसलेल्या ठिकाणाहून २ अशा एकूण १४ मोटार सायकली चोरल्या होत्या. जयने या मोटार सायकली पातोंडा,भामरे,कजगाव, पासडी,मजरे,खाजोळा,चाळीसगाव आदी ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी सांगून गहाण ठेवलेल्या होत्या. या सर्व दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून त्याच्याकडून इतर गुन्हे उकल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पुढील तपास पोहेकॉ अभिमन पाटील हे करीत आहेत.

Add Comment

Protected Content