Home क्राईम अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0
109

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका सतरा वर्षीय मुलीला आमिष दाखवत अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुलगी ही घरात असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत तिचे अपहरण केल्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरूवार २८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता तिच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी करीत आहे.


Protected Content

Play sound