


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलीत गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव महाविद्यालयात गणपतीची स्थापना झाली होती आणि १० दिवसांच्या मुक्कामानंतर लाडक्या बाप्पाला पाणावलेल्या डोळ्यांनी विद्यार्थ्यांनी निरोप दिला.
याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते गणपतीची महाआरती झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य सादर करून संस्कृतीचे दर्शन घडविले. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… एक दोन तीन चार… गणपती बाप्पाचा जयजयकार… अशा घोषणा देत एम.आय.डी.सी परिसरामध्ये गणपती मिरवणूक काढलेली होती.
ढोल ताशे, गणपतीचा जयजयकार यांनी परिसर मंत्रमुग्ध झाला होता. यावेळी महाप्रसादाचे आयोजन महाविद्यालयात केलेले होते. गणपती विसर्जनाला विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. याप्रसंगी महाविद्यालयाच्या डॉ.निलिमा वारके यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



