प्रसिध्द व्यावसायिक अरूणकुमार वोरा यांचे अपहरण

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काच बॉटल सप्लायर आणि प्रसिद्ध व्यावसायिक अरुणकुमार वोरा यांचे अपहरण झाल्याची अकोल्यात खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना काल रात्रीच्या सुमारास चारजिन कपाउंउ परिसरात घडली आहे. त्यांचा दगडीपुलाच्या भागात गोदाम आहे. या गोदामातून बाहेर पडताना पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन त्यांच्याजवळ आली. त्यानंतर त्यातील २ ते ३ जण वाहनातून खाली उतरले आणि धाक दाखवत त्यांचं अपहरण करण्यात आले.यादरम्यान त्यांनी ‘बचाव-बचाव’ म्हणून आरडाओरड देखील केली. मात्र, तोपर्यत उशीर झाला आणि अपहरणकर्त्यांनी वाहन सुसाट वेगानं पळविले.

अकोला पोलिसांकडून सध्या अरुणकुमार वोरा यांचा शोध सुरू करण्यात आला. अपहरण झाल्याचे कळताच स्थानिकांनी पोलिसांना कळवले. एसीपी कुळकर्णीसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळावर पोहचला. पोलिसांकडून तत्काळ पाऊले उचलल्या गेली असून परिसरातील सीसीटीव्ही तपासून अपहरणकर्त्यांचा शोध सुरु आहे.त्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. अरुणकुमार यांचं नेमक्या कोणत्या कारणासाठी अपहरण करण्यात आले? अपहरणकर्ते नेमके कोण आहेत? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Protected Content