चाळीसगावातून एकाची दुचाकी लांबविली

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील कन्या शाळेसमोर उभी केलेली एकाची दुचाकी अज्ञाताने लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त, शहरातील रामवाडी येथील सचिन दिलीप गुंजाळ (वय-३२) हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहे. चहाची हॉटेल चालवून ते आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह करीत असतात. दरम्यान गुंजाळ हे गुरुवार, २३ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास मुलीसह आनंद मेळाव्यात दुचाकीने केले. तेव्हा गुंजाळ यांनी आपली दुचाकी (एम.एच १९ बिझेड ९५११) शहरातील कन्या शाळेसमोर उभी केली. आनंद मेळाव्यातून परतल्यावर त्यांना मूळ जागी दुचाकी दिसून आली नाही. त्यावर त्यांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध केली. परंतु ३५ हजार रुपये किमतीची ड्रीम योगा कंपनीची दुचाकी मिळून आली नाही.
त्यामुळे कोणीतरी अज्ञात इसमाने मोटारसायकल चोरून नेली असावी अशी खात्री झाली. त्यानंतर लागलीच चाळीसगाव शहर पोलीस स्थानक गाठून गुंजाळ यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरु आहे.

Protected Content