मारुळ बौद्ध विहार समाज मंदीर भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मारूळ येथे ग्रामपंचायतव्दारे दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत समाज मंदिराचे भूमिपूजन आज संपन्न झाले.

येथील ग्राम पंचायतचे सरपंच तथा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे यावल तालुका उपाध्यक्ष सैयद असद अहमद जावेद अहमद यांच्या हस्ते कुदळ मारून, उपसरपंच सलामत अली सय्यद यांनी श्रीफळ फोडून आणि मारूळ गावचे पोलीस पाटील नरेश मासोळे यांनी कुदळ व श्रीफळ फोडून भूमिपूजन केले.

या कार्यक्रमाला मारूळ ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व संजय गांधी निराधार समितीचे तालुका कार्यकारणी सदस्य जावेद अहमद सय्यद यांनी उपस्थित ग्रामस्थ व सर्व सदस्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला मारूळचे पत्रकार अली सैयद, ग्राम रोजगार सेवक संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बाळू तायडे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण हातकर, कालू कौतिक तायडे, माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर तायडे, तुकाराम तायडे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळू भास्कर तायडे, निळे निशान सामाजिक संघटनेचे संजय तायडे, युवराज धनु इंगळे व सर्व बौद्ध पंचमंडळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.