भुसावळात संशयित आरोपीस अटक

bhusawal

भुसावळ प्रतिनिधी । गुन्ह्यातील एका आरोपीस भुसावळातील पापा नगरातून अटक केली असून आज संशयित आरोपीस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती अशी की, भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यातर्फे ६ रोजी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी भुसावळ दिवाणी न्यायाधिश यांनी पाहिजे असलेला आरोपी शेरू अली सलतनत अली इराणी (वय-28) रा. पापा नगर हा मिळून आल्याने त्याला भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याला आज दिवाणी न्यायलयात हजर करण्यात येणार आहे.

यांनी केली कारवाई अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप परदेशी, स.फौ. तस्लिम पठाण, पोहेकॉ अयाज सैय्यद, पो.ना.चंद्रकांत बोदडे, नेव्हील बाटली, रमण सुरळकर, पोकॉ विकास सातदिवे, उमाकांत पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी यांनी कारवाई केली.

Protected Content