सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या नेत्याचा खून

सांगली प्रतिनिधी । जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील माजी पं.स. सभापती तथा राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांची क्रूर हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती होते. देशींग इथं अज्ञात मारेकर्‍यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. विशेष बाब म्हणजे चारच दिवसांपूर्वी पलूस येथे राष्ट्रवादीचेच एक नेते आनंदराव पाटील यांचा खून झाला होता. त्या प्रकरणाचा छडा अद्याप लागलेला नाही. असं असतानाच पुन्हा एक खून झाला आहे. लागोपाठच्या या हत्यासत्रामुळं जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत जनआक्रोश निर्माण झालेला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते युवराज पाटील यांचा खून झाला होता. त्या प्रकरणात संशयित म्हणून मनोहर पाटील यांचं नाव पुढं आलं होतं. त्यांच्या खुनाचा युवराज पाटील हत्येशी काही संबंध असल्याची शक्यता असून या दिशेने पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Protected Content