कब्रस्तानमधून होणारी वाळू वाहतूक त्वरीत थांबवा; जिल्हा प्रशासनाला निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील नांदेड गावातील कब्रस्तानमधून गेल्या आठ दिवसापासून अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याने कबरीची विटंबना होत आहे. भविष्यात कोणताही वाद उद्भवू नये यासाठी शासनाने वाळू वाहतूक बंद करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन सोमवारी १ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता जळगाव येथील मुस्लिम मन्यार बिरादरीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांना निवेदन देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील नांदेड या गावात शासनाने मुस्लिम बीरादरीला २० आर शेत्र जमीन कब्रस्तानासाठी दिली आहे. त्यावर मुस्लिम समाजातील दफन विधी होत असतो, गेल्या आठ दिवसांपासून या कब्रस्तान मधूनच अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. या वाहतूकीमुळे कबरीची विटंबना होऊन धार्मिक द्वेष पसरविला जात आहे. ज्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने त्वरित आळा घालावा, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास वाळू वाहतूकदार व वाळू माफिया जबाबदार राहील असा इशारा निवेदनातून दिला आहे. मुस्लिम मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्या नेतृत्वात नांदेड येथील रहिवाशांनी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांना निवेदन दिले आहे.

याप्रसंगी मुस्लिम मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, उपाध्यक्ष सय्यद चांद, संचालक अख्तर शेख, शिकलगल बीरादरीचे मुजाहिद खान, साहिल पटेल, आबीद खान सह नांदेड येथील मन्यार बिरादरीचे अजीम मणियार, शकील मणियार, सलमान मणियार, शेख शामद मणियार, नवीद मन्यार, जमील मण्यार, अकील मन्यार, अनिस पटेल, कलीम खाटीक, बशीर पिंजारी, नुमान शाह, फक्रुद्दीन शेख यांची उपस्थिती होती.

Protected Content