फुल विक्रेत्या वृध्दाला शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील बामोशी बाबा दर्गा समोर लावलेल्या फुल विक्रेत्याने सावलीसाठी खड्डे केल्याच्या कारणावरून वृध्दाला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार रविवारी ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता चाळीसगव शहर पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शंकर गणपत राठोड वय ७५ रा. जहांगिरदार वाडी, चाळीसगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शहरातील बामोशी बाबा दर्गाजवळ ते फुलांचे दुकान लावून आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता फुलांच्या दुकानासमोर सावलीसाठी ते खड्डा करत होते. खड्डा करण्याच्या कारणावरून फरदीन शेख फारूख मुजावर याने वृध्दाला शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान गणपत राठोड यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी फरदीन शेख फारूख मुजावर याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रविंद्र पाटील हे करीत आहे.

Protected Content