गावठी पिस्तूल व काडतूसासह एकला अटक; चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी करून कारवायांना सुरूवात केली आहे. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेरुघाटी ते वैजापुर रोड फारेस्ट नाक्याजवळ अवैधरित्या गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुसासह एका संशयिताला पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेहमल जेमल पावरा वय ३३ रा. जिरायत पाडा, ता. चोपडा असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहमल पावरा हा तरूण आपल्या सोबत गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती चोपडा ग्रामीण पोलीसांना मिळाली. त्यावेळी तो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेरूघाटी ते वैजापूर रोडने जात असतांना पोलीसांनी त्याला अडविले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ २५ हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल, १ हजार रूपये किंमतीचा जिवंत काडतूस मिळून आले. पोलीसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे. शिवाय त्याच्या सोबत असलेली दुचाकी देखील ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी पो.कॉ.चेतन सुरेश महाजन यांच्या फिर्यादिवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून आरोपी रेहमल जेमल पावरा यास अटक करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ शशिकांत पारधी करत आहेत.

Protected Content