ग्रामीण जनतेला मूलभूत सुविधांची गरज-अमरिशभाई पटेल

चोपडा प्रतिनिधी । ग्रामिण भागात चांगले रस्ते ,पुरेशी वीज, चांगल्या गटारी, पुरेसे पाणी ह्या गरजा जरी पूर्ण केल्या तरी ग्रामीण जिवनमान उंचावेल असे प्रतिपादन शिरपूरचे माजी आ.अमरिशभाई पटेल यांनी एका कार्यक्रमात बोलतांना सांगितले.

या कार्यक्रमात अमरीशभाई पटेल म्हणाले ककी. ग्रामिण भागाचा विकास खुंटला आहे आणि असेच सुरू राहीले तर खेड्यात राहाने जीवन जगणे कठीण होऊन जाईल खेड्यातील परिस्थिती सुधारायची असेल तर सर्वात अगोदर शेतीत पूर्ण पाणी दया तद्नंतर मूलभूत गरजा दिल्या गेले पाहिजे शेतकर्‍यांचा मुलांना उच्चप्रतीचे शिक्षण दिले पाहिजे. आम्ही शिरपूर मध्ये उच्चप्रतिचे शिक्षण देत आहोत म्हणूनच शिरपूर शहरातील तीन विद्यार्थी आयपीएस परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. आधुनिक युगातील शिक्षण पद्धत अवलंबली गेली पाहिजे. तसेच वैद्यकीय सेवा देखील दर्जेदार मिळायला हवी. ग्रामीण भागातील जनतेला ह्या सर्व सोयी आपल्याच भागात मिळाल्या तर ग्रामिण जनता बेरोजगारीत अडकून राहणार नाही तर त्यालाही कामाची आवड निर्माण होईल आणि परिस्थितीवर मात करून आपले जीवनमान उंचावेल. लवकरच मी मुंबई पुण्यासारखा दवाखाना लवकरच आणणार आहे. जवळपास ३५० बेडचे हे हॉस्पिटल असणार यात आधुनिक मशनरी असणार आहे शिरपूर मधील पेशंटला बाहेर जाण्याची आवश्यकता नाही अशी सुविधा ह्या दवाखान्यात राहणार आहे.

अमरीशभाई पुढे म्हणाले की, आत्ताच्या सरकारला ग्रामिण जनतेशी आत्मीयता नाही ५० करोड रुपयाचे मी रस्ते बनविले अंडरग्राऊंड गटारी बनवील्या आमचे सरकार होते तेव्हा १४० करोड रुपये मी शिरपूरचा विकासासाठी आणले होते.

Add Comment

Protected Content