महामार्गाच्या कामाने घेतला रिक्षा युनियनच्या अध्यक्षाचा बळी

कासोदा, ता. एरंडोल प्रतिनिधी । महामार्गाच्या सुरू असणार्‍या कामातील निष्काळजीपणामुळे रिक्षा युनियनचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर शिवाजी महाजन यांचा बळी घेतल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

याबाबत वृत्त असे की, २५ एप्रिल रोजी रोजी भडगांव रोड हायवेवर पाचोरा जात असतांना भडगांव येथिल शिवाजी नगर येथे वास्तव्यास असणारे व मालवाहतुक रिक्षा युनियनचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर शिवाजी महाजन यांचा अपघात झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना पुणे येथे त्यांचे निधन झाले. महाजन यांच्या मृत्यूस महामार्गाच्या कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चाळीसगावपासून पाचोर्‍यापर्यंत सुरू असणार्‍या हायवेच्या कामामुळे नागरिकांना त्रास होत आहे. महामार्गावर काही ठिकाणी बारीक चुनखडी पडली आहे. संथ गतीने होणारे काम, पाणी न मारल्याने धुळीमुळे होणारा डोळ्यांना त्रास तसेच जोरात चालणारी अवजड वाहने यामुळे दुचाकी तसेच तीनचाकी वाहनधारकांना रस्त्यावर चालणे अशक्य झाले आहे. अलीकडेच नगरदेवळा स्टेशन येथे एका हायवेच्या डंपरने नगरदेवळा येथिल जोडप्यास जोरात धडक दिली होती. यानंतर आता या ५८ वर्षीय ज्ञानेश्‍वर महाजन हे हायवेचे बळी ठरले आहेत. पुणे येथे ईलाज चालु असतांना त्यांचे निधन झाले आहे. घरातला कर्ता पुरूष गेल्याने त्यांच्या कुटूबांवर मोठा आघात झाला आहे. महामार्गावर धुळच-धुळ असल्याने अजून हा हायवे बळी घेणार का ? या हायवेचे ठेकेदार सरस्वती ईन्फ्रा व अशोका बिल्डकॉन यांचे अधिकारी झोपा काढत आहेत का? असा प्रश्‍न थेट जनता विचारत आहे. याविषयी कासोदा येथील भारतीय पत्रकार महासंघाचे अध्यक्ष केदारनाथ सोमाणी , तालुका अध्यक्ष नुरुद्दीन मुल्लाजी, व सद्स्य हे जिल्हा अधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग याना निवेदन देणार आहेत असा इशारा केदारनाथ सोमाणी यांनी दिला आहे.

Add Comment

Protected Content