जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दाणा बाजार परिसरातील जनता बँकेच्या शाखाधिकारी यांचा ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना सोमवारी २२ एप्रिल रोजी रात्री १ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायंकाळी २ वाजता अज्ञात चोरट्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, ओमकार उत्तमराव पाटील वय-५३, रा. जुने भगवान नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्य असून दाना बाजार येथील जनता बँकेत ते शाखाधिकारी म्हणून नोकरीला आहे. दरम्यान सोमवारी २२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ते बँकेत असताना अज्ञान चोरट्यांनी त्यांचा ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ओमकार पाटील यांनी जळगाव शहर पोलीस ठाणे तक्रार दिली आहे. त्यानुसार सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन बडगुजर हे करीत आहे.