बोदवड येथे महाजनादेश यात्रेचे दणकेबाज स्वागत

bodvad yatra

बोदवड, प्रतिनिधी | येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महाजनादेश यात्रेचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले.

 

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले. हे सरकार पाच वर्षांमध्ये दीन, दलित, आदिवासी, यांचा सर्वांगीण विकास करीत आहे. शासनाच्या सर्व योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. ३० हजार कोटींची सर्वात मोठी कर्ज माफी शेतकऱ्यांना दिली आहे. सहा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आम्ही बनवले आहेत. राज्यात १८ हजार तलावांचे काम आम्ही पूर्ण केले असून सहा हजार शेततळी बनवून काँग्रेसने बंद केलेल्या योजनेचे पुनरुज्जीवन आमच्या सरकारने केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनीही मार्गदर्शन केले. जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीष महाजन यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.

यावेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, बोदवडच्या नगराध्यक्ष मुमताजबी बागवान, उपनगराध्यक्ष दिनेश माळी, भाजपा नगरपंचायत गटनेते कैलास चौधरी, अनिल खंडेलवाल, रामदास पाटील, गणेश पाटील, सईद बागवान, मधुकर राणे, भानुदास गुरचळ, भागवत टिकरे यांच्यासह परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content