जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचा मार्ग मोकळा

जळगाव Jalgaon प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीबाबत सहकारी निवडणूक अधिकारी डॉ. ज्योती लाटकर यांनी निर्देश जारी केल्यामुळे आता बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने १० डिसंेबर २०१९ रोजीच्या पत्रानुसार जिल्हा बँकेच्या ( Jalgaon District Bank )सभासद यादीचा कार्यक्रम जाहीर केला होता. प्राधिकरणाने २३ डिसंबर रोजी बँकेच्या सभासद संस्थांकडून ठराव मागणीच्या अंतिम दिनांकास ३१ जानेवारी २०२०पर्यंत मुदतवाढ दिलेली होती. २७ जानेवारी रोजी उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. ज्या संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र स्वीकारणे सुरु झालेले आहे. अशा संस्था वगळून राज्यातील जिल्हा बँकांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचे आदेश देण्यात आलेले होते.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने २७ जानेवारी रोजी ठराव मागवण्याची प्रक्रिया व मतदार यादी प्रसिद्धीची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा बँकेची ठराव मागवण्याची प्रक्रिया पाच दिवसांकरीता स्थगित झालेली होती. २ फेब्रुवारी २०२१च्या आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत आदेश देण्यात आलेले होते. त्यानुसार प्राधिकरणाने १० फेब्रुवारी रोजी जिल्हा निवडणूक आराखड्यातील प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून ज्या टप्प्यावर स्थगित झाल्या असतील, त्या टप्प्यापासून पुढे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

मतदार यादीच्या दिलेल्या कार्यक्रमात सुधारणा करून २७ ते ३१ जानेवारी २०२० या मुदतीत थांबलेली संस्था सभासद प्रतिनिधींचा ठराव दाखल करण्यासाठी १५ ते २२ फेब्रुवारी या ५ दिवसांच्या कालावधीत देण्यात आला आहे. जिल्हा बँकेच्या संस्था सभासद प्रतिनिधीचा ठराव मागणीसाठी १५ ते २२ या कालावधीत ठराव मागवण्यात आले आहेत. या निवडणुकीसाठी यापूर्वी प्राप्त झालेले संस्था प्रतिनिधींचे ठराव ग्राह्य धरण्यात येणार आहेत. इतर संस्थांचेही ठराव प्राप्त झाल्यानंतर मतदार याद्या तयार करण्यात येतील. त्यानंतर प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध करून त्यावर आक्षेप व हरकती मागण्यात येणार आहेत. त्या हरकतींवर सुनावणी होऊन महिनाभरात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर जिल्हा बँकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

Protected Content